Ad will apear here
Next
अंगारक चतुर्थीनिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरात आकर्षक सजावट

पुणे : अंगारक संकष्ट चतुर्थीनिमित्त संपूर्ण श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती मंदिर फुलांनी सजवण्यात आले असून, अत्यंत आकर्षक अशी ही सजावट डोळ्याचे पारणे फेडत आहे. भाविकांसाठी पहाटे तीन वाजल्यापासून मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले असून, पहाटेपासूनच भाविकांनी गणरायाच्या दर्शनासाठी येथे गर्दी केली आहे.

संपूर्ण मंदिर वेगवेगळ्या रंगांच्या फुलांनी केलेल्या आकर्षक रचनांनी सजवण्यात आले असून, आतील भागही फुलांच्या माळा, तोरणांनी सजला आहे. वेगवगेळ्या रंगांतील फुलांच्या चक्रांमध्ये स्वस्तिक, श्री, ओम, कलश ही शुभचिन्हे साकारण्यात आली आहेत.

 गणरायाची मूर्तीही फुलांनी सजली असून, बाप्पाची साजरी मूर्ती अधिकच मनोहर दिसत आहे. बाप्पाचे हे रूप भाविकांना आनंद देत आहे.

‘श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती मंदिर ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळाच्यावतीने मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे. यामध्ये स्वराभिषेक, गणेशयाग आदींचा समावेश आहे,’ अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी दिली. 

मंगळवारी पहाटे चार ते सहा या वेळेत स्वराभिषेकांतर्गत गायक अमोल पटवर्धन यांनी आपली गायनसेवा गणपती रुजू केली, तर सकाळी आठ ते दुपारी १२ यावेळेत गणेशयाग करण्यात आला. 

(फुलांनी सजलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती मंदिराची झलक दर्शविणारा व्हिडिओ सोबत देत आहोत.) 

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/EZUTCE
Similar Posts
दगडूशेठ गणपती शहाळ्यांमध्ये विराजमान पुणे : ‘वैशाखवणव्यापासून तमाम भारतीयांचे रक्षण व्हावे, दुष्काळ सहन करण्याची ताकद मिळावी, शेतकऱ्यांच्या समस्या गणरायाच्या कृपेने निर्विघ्नपणे सुटाव्यात,’ असे साकडे पुष्टिपती विनायक जयंतीनिमित्त दगडूशेठ गणपतीला घालण्यात आले. त्या निमित्ताने १८ मे रोजी दगडूशेठ मंदिरात शहाळे महोत्सव आयोजित करण्यात आला होता
वेडात मराठे वीर दौडले सात... नाट्यातून उलगडला इतिहास.. पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म... त्यांचे बालपण... तानाजी मालुसरे-शिवाजी महाराज भेट... अफझलखानाचा वध... बहलोल खानाचा धुमाकूळ... बहलोल खानास धुळीस मिळवा.. महाराजांचे फर्मान... आपल्या सहा सरदारांबरोबर प्रतापरावांनी बहलोल खानाच्या छावणीवर केलेली चढाई... अशा चित्तथरारक प्रसंगांतून ५० कलाकारांनी ‘वेडात मराठे वीर दौडले सात
नवोदित कलाकारांसाठी मोफत अभिनय कार्यशाळा पुणे : गिरीश देशपांडे आणि माणुसकी फाउंडेशन यांच्या वतीने नवोदित कलाकारांसाठी मोफत अभिनय प्रशिक्षण कार्यशाळा आयोजन करण्यात आले आहे.
सूर्यमंदिरात विराजमान होणार दगडूशेठ गणपती पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ यांच्या वतीने ट्रस्टच्या १२७व्या वर्षानिमित्त गणेशोत्सवात ओडिशा राज्यातील जगप्रसिद्ध कोणार्कचे सूर्यमंदिर साकारण्यात येणार आहे. यंदाची संकल्पना भारताच्या प्राचीन वेद, पुराणे, शास्त्रे यांवर आधारित आहे. त्यामुळे या गणेशोत्सवात दगडूशेठ

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language